माझे मित्र ब्लॉग

Wednesday, August 13, 2014

प्रेम.......:)



राधेचा उल्लेख केला कि कृष्ण तिथे आला...
कृष्ण जिथे आहे तिथे प्रेमाचा वर्षाव झाला_
प्रेमाचे हे बंध कसे जुळुनी आले...
विरह असून पण कायमचे एक झाले_

…कविता 

Saturday, August 9, 2014

:)

बेधुंद पाऊस खूप कोसळला_
त्यातच त्याने माझा हात पकडला,
मग काय सांगू पुढे काय झाले_
.
.
.
.
.
.
भरधाव गाडी आली अन तिने चिखल उडवला....

…कविता 

Friday, June 13, 2014

..........

 राधेचा कृष्ण थोडासा वेडा वाटला..,
बोलता येई ना थोडा अडखळलेला,
एवढे पण राधा राधा नको करूस..,
रंगून जाशील रंगात जास्त मस्ती नको करूस..
... कविता



शब्द तर वेळेवरच येतात
वाट मात्र सापडत नाही..,
गर्दी खूप आहे रे गड्या
वाट तर तुला बघावीच लागेल..,
.
कविता



एवढे सोपे नसते एका क्षणात जगणे..
सारे काही एका क्षणार्धात भेटणे
उद्या तर नक्कीच येईल या विश्वासाने जगणे..
शेवटी हेच तर आहे जीवनाचे गुपित खरे...
.
क़विता


शब्दांचा खेळ खेळत जा.,
सगळ्यात सोपा तर हाच खेळ असतो,
कधी कधी तर या शब्दात.,
दोन जीवांचा मेळ होतो..
.
कविता


 आयुष्य खूप सुंदर आहे..
जगायला फक्त बहाणा हवा,
एवढे बोलून पण दोन शब्दांची कमी..
यालाच तर म्हणतात मैत्रीचा छंद नवा..
.
कविता


तुटली तरी मनात कायम राहते..
जोडली तरी गाठ गाठीचा रुपात जुडत राहते
मैत्री आहे हि शेवटी
प्रेम नाही जे तोड म्हटले कि साथ सोडते...
.
.
कविता



 आयुष्याला पुरून उरेल अशी आहे मैत्री..
आयुष्यात काय आयुष्यानंतरहि निरंतर राहील हि मैत्री...
.
कविता


उधाणलेला वारा पण कधी तरी शांत होतो..
आपली वाट काढून योग्य दिशेत जातो 
प्रेमाची चाहूल तर लागेलच रे, कारण,.. 

तुटलेलं हृदय पण परत कुणीतरी जोडत
.
क़विता



हृदयाचा जखमा(भेगा) पण भरून निघतात
प्रयत्न करून बघ डोळे उघडे ठेऊन पण स्वप्न बघता येतात... कविता