माझे मित्र ब्लॉग

Thursday, June 14, 2018

शिरकाव काय असतो?




शिरकाव काय असतो

ते वारयाला विचारा जेव्हा 

उडवुनी केसांची बट त्याने 

दिला झटका झुमक्यांना


मिलिंद (नंदू) आग्रे . . .


https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

Thursday, June 7, 2018

गर्द अशा आठवणींने..



दाटुनी आले आभाळ 

गर्द अशा सावलीने 

जुळल्या काही तारा 

गर्द अशा आठवणींने


मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

Monday, June 4, 2018

आठवणींमध्ये चुरस..



आठवणींमध्ये पण चुरस रंगली

मिच वरचढ सिद्ध करण्याची

मि शांतपणे सर्वांना जागा केली

माझ्यासाठी प्रत्येक लाखमोलाची



मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

अडगळीतल्या आठवणी...



एक वादळ काय आले

☔अडगळीतली छत्री ☔

अन

💭अडगळीतल्या आठवणी💭

दोन्ही बाहेर आल्या.. 


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 


https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

माझी आठवण...


पाऊस नभी दाटलाय

तू खिडकी काय बंद करतेय

माझी आठवण पण बघ न

कशी कवडसा शोधतेय


 मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

Wednesday, May 30, 2018

आठवणींची फाईल ...



कशीबशी समजुत घालून
आठवणींची केस बंद केलेली

एक गार झुळुक काय आली
फाईल पून्हा उलगडली गेली

लाच देऊ पाहीली त्यांना मी
पण ऐटीत भिरकावून ती दिली

जामिनावर सुटलेल्या जीवाला
आता पून्हा शिक्षेची भिती लागली


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

Monday, May 28, 2018

विणलेला मी गोफ दुहेरी..



विणलेला मी गोफ दुहेरी
खुलविण्या अपुल्या नात्याचा
हसरा चेहरा झाला जायबंदी
जेव्हा डाव मोडला खेळाचा ..

मृगजळ सारे विरून गेले
पाऊस होऊनि वाहुनी गेले
अर्थ न राहिला आता जराही 
हातावरच्या अस्पष्ट रेषांचा ..

राहिलो मी किनारी एकटा
पाहत त्या फेसाळलेल्या लाटा
थांग आता लागणार तरी कसा
अवसेच्या रातीला चंद्राचा ..

सावली झाली गडप कोठे
स्पर्श हे झाले मुके असे 
उलटे पडले फासे सारे 
रंग उडाला हा बहराचा ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

Sunday, May 27, 2018

दडी मारलेले ढग..


दडी मारलेल्या ढगांशी 

वाऱ्याने केली लगट 

प्रयत्न केले सुटायचे पन 

ओढुन आणले सरसकट 


मिलिंद (नंदू) आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58
Mb. No :- 8108821950

Friday, May 25, 2018

दाटले आभाळ..


दाटलेय आज आभाळ 

गर्द काळ्या ढगांनी 

आता बहरेल प्रवास 

पून्हा गोड आठवणींनी.. 


मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

सुटलाय वारा बेभान




सुटलाय वारा बेभान 

आठवणींना घेऊनी

आता येऊन धडकतील

पून्हा नव्या जोमानी

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

बंदिस्त आठवणींना... 💘



बंदिस्त आठवणींना

जामीन मिळालाय

आत्ता हक्काने त्यांनी

धुडगूस घातलाय.. 



मिलिंद (नंदू) आग्रे . . . 


https://www.facebook.com/milind.agre.58 


  • Mb. No :- 8108821950

Monday, July 3, 2017

खिडकीच्या काचेवर ..






लिहिले तुझे नाव मी 
खिडकीच्या काचेवर ..
थेंबाची रीघ लागली
त्या एका अक्षरावर ..

विचार करता करता 
हरपुनी गेलो तुझ्यात ..
कळलेच नाही कधी 
पाऊस विरला क्षणात ..

   मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Thursday, June 22, 2017

भाडेकरू या मनाचे ...





अजूनही मनात डोकावते 

कवडसे तुझ्या आठवणींचे ..

गार झुळूक घालते येरझारा 

जणू तेच भाडेकरू या मनाचे ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Wednesday, June 7, 2017

खेळ चालू राहिला ...



दव पडायचे त्या ओल्या काचेवर 

अन नाव मी गिरवायचो त्यावर ..

पावसाचे पुसणे अन माझे लिहिणे 

खेळ चालू राहिला हा रात्रभर ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

साधला मोका ...




गरम मक्याच्या कणसाची गोडी,

त्यात तिचे ते भीजलेले केस ..

आडोशाला उभे राहुनी आम्ही ,

साधला मोका असा तो थेट ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

तिच्या हसण्यानेच ,..




एक टपोरा थेंब ,
पावसाच्या सरींतून कोसळला ..
तिच्या हसण्यानेच ,
गालाच्या खळीतून निखळला ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Friday, June 2, 2017

तिच्या गालाच्या खळीत ...



इवलासा थेम्ब तो पण,

स्वर्गात न्हाऊन गेला ..

तिच्या गालाच्या खळीत,

घर करून तो बसला ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

किती दिवसांचा अबोला ...



दुरावलेल्या नात्यातला गोडवा 

त्या दामिनी ने दूर पळवला ..

किती दिवसांचा अबोला आमचा 

त्या सरींनी चटदिशी सोडवला ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

आज त्या टपोऱ्या थेंबांनी ...




आज त्या टपोऱ्या थेंबांनी 

चांगलाच कहर केला ..

मला डिवचून तो चक्क 

तिच्या ओठांवर विसावला ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Tuesday, May 30, 2017

पुन्हा नव्याने ...



पावसाची सर कोसळली की,

जणू नवा मोहरच फुलतो ...

आम्ही कवीवेडे तर नव्याने 

पुन्हा पावसाच्या प्रेमात पडतो ...


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Monday, May 29, 2017

आठवणींच्या गदारोळात ...




आल्या गेल्या सरी कितीही

तरी तिची सर कुणालाच नाही.. 

आठवणींच्या गदारोळात

अव्वल स्थान कुणालाच नाही.. 

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

येईल ती सर ...



आता लवकरच येईल ती सर,


जी दरवर्षी येऊन भिजवून जाते ..



सुकलेल्या मनाच्या पानांवर,



नवी हिरवी शाल फुलवून जाते ..




मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

Tuesday, October 18, 2016

प्रेम तुझ्यावर आहे
तुझ बनुन रहायचय
तुझ्या स्वप्नाच्या घरात
नवीन विश्व उभारायचय...
..कV...😘😘

Wednesday, August 24, 2016

कुणी म्हणे माखनचोर..
कुणासाठी नंदकिशोर_
ह्रद्याचा चुकवी ठोका..
जेव्हा नाव येई ओठावर_
...जन्माष्ठमीच्या हादॅिक शुभेच्छा..🙏🙏

Saturday, September 5, 2015

जन्माष्टमीच्या हार्दीक शुभेच्छा🌸🌷🌸

नंदाच्या घरी नंदनवन फुलले..
नव पाहुण आज घरी आले_
रुप साजरे खटयाळ फार..
देवकीचे लेकरु यशोदेचा प्राण_

जन्माष्टमीच्या हार्दीक शुभेच्छा🌸🌷🌸
जय श्री कृष्ण..🙏
From कवि💐🌺

Friday, July 24, 2015

स्पर्श

गोड तुझा स्पर्श अनुभवायचा आहे,

पुन्हा एकदा तुझ्यासोबत एक क्षण जगायचा आहे,

खेळच होता का हा सारा मांडलेला...

कि तुला पन येते माझी आठवन..आज हे जानायचे आहे.

...कवि

फक्त तू...

एकमेकांच्या मिठीत घालवलेले ते क्षण काहि वेगळे होते,

मि तुझ्यात तू माझ्यात सारे विश्वच हरवले होते,

कुनाची नजर लागली या स्वप्नाला,

बघितली खुप सारी स्वप्न...
माहित नव्हते एक पन सत्यात उतरनारे नव्हते...

कवी


नयन