माझे मित्र ब्लॉग

Thursday, June 22, 2017

भाडेकरू या मनाचे ...





अजूनही मनात डोकावते 

कवडसे तुझ्या आठवणींचे ..

गार झुळूक घालते येरझारा 

जणू तेच भाडेकरू या मनाचे ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Wednesday, June 7, 2017

खेळ चालू राहिला ...



दव पडायचे त्या ओल्या काचेवर 

अन नाव मी गिरवायचो त्यावर ..

पावसाचे पुसणे अन माझे लिहिणे 

खेळ चालू राहिला हा रात्रभर ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

साधला मोका ...




गरम मक्याच्या कणसाची गोडी,

त्यात तिचे ते भीजलेले केस ..

आडोशाला उभे राहुनी आम्ही ,

साधला मोका असा तो थेट ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

तिच्या हसण्यानेच ,..




एक टपोरा थेंब ,
पावसाच्या सरींतून कोसळला ..
तिच्या हसण्यानेच ,
गालाच्या खळीतून निखळला ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

Friday, June 2, 2017

तिच्या गालाच्या खळीत ...



इवलासा थेम्ब तो पण,

स्वर्गात न्हाऊन गेला ..

तिच्या गालाच्या खळीत,

घर करून तो बसला ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

किती दिवसांचा अबोला ...



दुरावलेल्या नात्यातला गोडवा 

त्या दामिनी ने दूर पळवला ..

किती दिवसांचा अबोला आमचा 

त्या सरींनी चटदिशी सोडवला ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

आज त्या टपोऱ्या थेंबांनी ...




आज त्या टपोऱ्या थेंबांनी 

चांगलाच कहर केला ..

मला डिवचून तो चक्क 

तिच्या ओठांवर विसावला ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950