माझे मित्र ब्लॉग

Thursday, March 20, 2014

For You...


Life......


गोंधळ



शब्दांनी शब्दांशी आज एक खेळ मांडला
चुकून बोलू के बोलून चुकू हा विचार करायचाच राहून गेला
तुझ्याशी बोलताना वेळ कुठे निघून गेला कळलेच नाही
पण तुझ्या प्रश्नांनी गोंधळून टाकले एवढे मात्र नक्की


फक्त तुझ्यासाठी


कविता गावडे 

(२७ डिसेंबर २०११)

जेव्हा तू जीवनात आलास




जेव्हा तू जीवनात आलास वाटले नव्हते कधी एवढी जवळीक होईल
तुझ्या वाचून एक पण क्षण जाणार नाही असा पण दिवस येईल_
.
.
तुझ्याबरोबर दिवस कसा जातो कळतच नाही
अन तू नसताना सोबत एक क्षण पण कित्येक दिवसांपरि_
.
.
नेहमी माझ्या सुख-दुखात माझ्या असाच सोबती रहा
अन तुझी गोड सोबत असताना आजून काही मागू कशाला_
.
.



फक्त तुझ्यासाठी

कविता गावडे 

( डिसेंबर २०११)

Tuesday, March 18, 2014

सहज सुचले म्हणून

जीव गुंतला का सांग तुझ्या मध्ये
प्रेम होते असे, जसे चालले मन वाऱ्यासवे
गुंतता हे मन हृदय हरवले तुझ्यामध्ये
चाहूल हि प्रेमाची कि प्रेमातच मी हरवले

कविता (१८ मार्च २०१४)

सहज सुचले म्हणून

म्हणतात कविता करणे खूप अवघड असते
पण आपल्या भावना शब्दात उतरवणे एवढे पण कठीण नसते
भावनांचा आणि शब्दांचा मेळ झाला कि बनते कविता
अन ज्याला हा खेळ जमला त्याच्यासाठी काहीच अवघड नसते…


कविता (१८ मार्च २०१४)

Monday, March 17, 2014

काश…… असे झाले असते




काश……  असे झाले असते
बोलताच तुला माझ्या मनातले सर्व कळाले असते
डोळ्यांनी डोळ्यांशी, हृदयाने हृदयाशी बोलून सारे गुपित उघडले असते….

काश……  असे झाले असते
अबोल हि भाषा जगाला पण कळली असती
सांगताच सगळी वळणे कशी सुरळीत चालली असती…..

काश……  असे झाले असते
तुला जगापासून चोरून नेता आले असते
दोघांनी मग स्वताचे सुंदर स्वर्ग उभारले असते….

खरच कधी असे असते….
तू माझा मी तुझी अन साऱ्या विश्वाची साथ आपल्या सोबती
हात तुझाच फक्त माझ्या हातात आणि तो वेगळे करणारे कुणी नाहीकुणीच नाही

फक्त तुझ्यासाठी……

कविता गावडे 

( डिसेंबर २०११)

असावा एक मित्र असा






असावा एक मित्र असा
स्वताचा जिवापेक्षा मला जास्त जपणारा
मला समजून घेणारा अन माझी प्रत्येक चूक माफ करणारा


असावा एक मित्र असा
मी दूर असताना क्षणाक्षणाला माझी आठवण काढणारा
माझ्या प्रत्येक दुखात सहभागी होणारा
माझे दुख घेऊन सुखाचा प्रत्येकक्षण मला देणारा

असावा एक मित्र असा
माझ डोक स्वताचा खांद्यावर ठेऊन मनातील
ओझ हलके करायला सांगणारा
माझ्या भविष्यातील स्वप्नांना नवीन आकार देणारा

“मैत्री”  या पवित्र शब्दाची किंमत जाणणारा
आयुष्याच्या वळणावर खडतर वाटचाल करताना असा एक तरी मित्र हवा

अगदी तुझ्यासारखा


कविता गावडे  (____)

Saturday, March 15, 2014

तुझ्या आठवणीत


कुणास ठावूक आज मन थांबले
रस्ता माहित होता पण मुद्दामून वाट चुकले
जाता जाता सोबतीला फक्त एकांत
सोबतीला तुझ्या आठवणी अन वाऱ्याचि लहर ती संथ

थोडासा मग विसावा घेतला एका समुद्रकिनारी
तिथे काही स्मरणात आल्या तुझ्या जुन्या आठवणी 
त्या आठवणींशी खेळता खेळता कळलेच नाही कधी संद्याकाळ झाली
स्वतास सावरले मग थोडे आणि घराची वाट धरली

पुन्हा आली ती रात्र पुन्हा तो एकांत
विचार केला आता तुला नाही आठवायचे
पण हा विचार करताना सुद्धा हे मन तुझ्याच चेहऱ्यावर येउन थांबते
तुझ्या या आठवणी मला कितवर रे छळ्नार

होशील रे तू माझा कि हि फक्त एक आस असणार…???

फक्त तुझ्या आठवणीत….

कविता…(२२ डिसेंबर २०११)

सहवास तुझा



जिथे फक्त तू आणि मी अशी सोबत असावी,
सकाळची ती रम्य पहाट किंवा संध्याकाळची शांतता असावी
एकमेकांशी बोलता बोलता दोघांची मते जुळावी अन,
हास्यविनोद करता करता दोघांची मते जाणून घ्यावीत

तुझ्या आवडीनिवडीशि माझा ताळमेळ व्हावा
नसू जरी एक तरी एकाच असल्याचा भास व्हावा
तू बोलावे मी ऐकावे, मी ऐकावे तू बोलवे
कधी कधी दोघांचे वाद तर कधी सामंजस्य असावे
कधी तरी बोलून तर कधी बोलताच सारे समजून घ्यावे,,,

रात्रीचा वेळी चांदण्यांचा वर्षाव अन सोबतीला त्या चंद्राची साथ
घनदाट काळोखात पडले ते चांदणे सोबतीला फक्त तुझा सहवास… 
सोबतीला तुझ्या जाईल ना अशी एक तरी दिवस-रात्र,
जिथे फक्त तू आणि तुझ्या सहवासाचा स्पर्श


फक्त तुझ्यासाठी


कविता गावडे  

(२४ डिसेंबर २०११)


तुझ्यासाठी

तुझ्या नजरेसमोर माझ मन स्थिरावत नाही
तू नजरेसमोर आलास के बोलल्याशिवाय राहवत नाही

आज मला काय होतंय हे मलाच उमगत नाही
पाऊले तुझ्या दिशेने वळतात पण तुझा ठाव मात्र लागत नाही

आयुष्यातिल हे क्षण माझ्या जीवनात कधी आलेच नव्हते
कुणासाठी जगण्यात पण आनंद असतो हे कडी उमगलेच नव्हते

तुझ्या सोबत राहून कधी नवे आयुष्य जगेन असे वाटले नव्हते
अन यालाच प्रेम म्हणतात  हे तर कधी समजलेच नव्हते

फक्त तुझ्यासाठी


कविता गावडे 

( जानेवारी २०१२)