माझे मित्र ब्लॉग

Monday, April 7, 2014

क्षण....




गेलेल्या क्षणाना जर परत आणता आले असते
तुझ्या सोबतचे किती क्षण मला परत भेटले असते …..***

काही गोष्टी खूप अधुऱ्या राहिल्या होत्या,
त्यांना आज मी पूर्ण केले असते
खूप दुखावते मी तुला
ते क्षणच कधी येऊ दिले नसते ….

तुझ्या चेहऱ्यावर एक हसू येण्यासाठी
खूप काही केले असते
त्याच निम्मिताने माझ्या हसण्याचे
रहस्य उलगडले असते….

परत अनुभवला असता तुझा सहवास
तुझ्या बरोबरचे ते गोड क्षण
कदाचित यापेक्षा सुंदर चित्रच
कुठले नसते…..******


फक्त तुझ्यासाठी


कविता गावडे  

No comments:

Post a Comment