माझे मित्र ब्लॉग

Saturday, March 15, 2014

सहवास तुझा



जिथे फक्त तू आणि मी अशी सोबत असावी,
सकाळची ती रम्य पहाट किंवा संध्याकाळची शांतता असावी
एकमेकांशी बोलता बोलता दोघांची मते जुळावी अन,
हास्यविनोद करता करता दोघांची मते जाणून घ्यावीत

तुझ्या आवडीनिवडीशि माझा ताळमेळ व्हावा
नसू जरी एक तरी एकाच असल्याचा भास व्हावा
तू बोलावे मी ऐकावे, मी ऐकावे तू बोलवे
कधी कधी दोघांचे वाद तर कधी सामंजस्य असावे
कधी तरी बोलून तर कधी बोलताच सारे समजून घ्यावे,,,

रात्रीचा वेळी चांदण्यांचा वर्षाव अन सोबतीला त्या चंद्राची साथ
घनदाट काळोखात पडले ते चांदणे सोबतीला फक्त तुझा सहवास… 
सोबतीला तुझ्या जाईल ना अशी एक तरी दिवस-रात्र,
जिथे फक्त तू आणि तुझ्या सहवासाचा स्पर्श


फक्त तुझ्यासाठी


कविता गावडे  

(२४ डिसेंबर २०११)


No comments:

Post a Comment