माहित नाही का आज वाटले
लेखणीला पुन्हा एकदा धार करावी
अडगळीतल्या एकुन एक आठवणींवर
साठलेल्या धुळी ला साफ बरं करावी
एकेक आठवण काढुन मनातुन मग
जगलेल्या क्षणांना पुन्हा पालवी दयावी
सांगाव त्यांना काय कमाल होतात राव तुम्ही
त्यांचीच त्यांना अनमोल किम्मत ती सांगावी
कधी कसे केव्हा काय चुकले नेमके
या सर्वांची गोळा बेरीज जरा करावी
वाणिज्य शाखा म्हणे आपली.. पण या
गणिताची हिशेबी भलतीच अवघड निघावी
झालं जून आता सर्व काही, खुप काळ लोटलायं
पण एक जगलेल्या त्या काळाची आठवण करुन द्यावी
*कविता* तर खुळ्या मनात तर आहेच म्हणा
पण म्हंटलं ...
या हरवलेल्या *कवी* ला पण आता जाग आणावी
मिलिंद (नंदू) आग्रे 📖✒️⚔️
Insta @milind579
https://www.facebook.com/milind.agre.58
Mb. No :- 8108821950






































